सामाईक विहिरीवरील मोटार सुरू करण्याच्या कारणावरून शेतकऱ्याला मारहाण


करमाळा /संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.२१: पुनवर येथे सामाईक विहिरीवरील मोटार सुरू करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात एकास  शिवीगाळ करून  मारहाण केल्याची घटना १६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत हनुमंत भुजंग शेळके (वय ५५, रा. पुनवर, ता. करमाळा) यांनी पोलिसांत  फिर्याद दिली.
त्यात त्यांनी म्हटले,की १६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८  वाजता वीज आल्यानंतर शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी  विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी गेले असता, दोन्ही मोटारी बंद असल्याचे  निदर्शनास आले. मोटारीच्या वायर तुटलेल्या दिसल्याने त्यांनी अशोक बाबुराव शेळके यांना याबाबत विचारणा केली. त्यावेळी अशोक शेळके यांनी मोटार सुरू करू नको, असे सांगत शिवीगाळ व दमदाटी केली.
तसेच हातातील लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांच्या डाव्या हाताच्या अंगठ्याजवळील बोटाला चावा घेऊन जखमी केले. यावेळी वाद सोडविण्यासाठी आलेल्या नातेवाइकांनाही त्यांने धमकी दिली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

error: Content is protected !!