गावगाडा साहित्य पुरस्कारासाठी साहित्यिकांना आवाहन

यंदा १७ वे वर्ष; ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत साहित्य पाठविण्याचे आवाहन

कंदर प्रतिनिधी / संदीप कांबळे

करमाळा : ग्रामीण लोकमानस आणि लोकसंस्कृतीचे प्रतिबिंब असलेल्या मराठीतील दर्जेदार साहित्यकृतींना प्रोत्साहन देण्यासाठी वडशिवणे (ता. करमाळा, जि. सोलापूर) येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने दिला जाणारा ‘गावगाडा साहित्य पुरस्कार’ यंदाही प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे हे १७ वे वर्ष असून, यासाठी साहित्यिकांनी आपले साहित्य पाठवावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

यंदाच्या पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत प्रकाशित झालेल्या कवितासंग्रहांचा विचार करण्यात येणार आहे. इच्छुक साहित्यिकांनी आपल्या कवितासंग्रहाच्या दोन प्रती, स्वतःचा अल्प परिचय आणि छायाचित्र यांसह ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत पाठवून द्याव्यात. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे.

यापूर्वीचे पुरस्कारप्राप्त साहित्यिक

गावगाडा साहित्य पुरस्काराने आतापर्यंत सन्मानित करण्यात आलेल्या साहित्यिकांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.

२०११ – भागवत बावळे, २०१२ – प्रा. डॉ. अर्जुन व्हटकर, २०१३ – सौ. कल्पना दुधाळ, २०१४ – पार्थ पोळके, २०१५ – सतीश दराडे, २०१६ – ऐश्वर्य पाटेकर, २०१७ – रावसाहेब कुंवर, २०१८ – तुकाराम पाटील, २०१९ – दिनकर कुटे, २०२० – जयदीप विघ्ने, २०२१ – हरिश्चंद्र पाटील, २०२२ – डॉ. कालिदास शिंदे व बाबुराव इंगळे, २०२३ – तान्हाजी बोऱ्हाडे, २०२४ – प्रकाश सोनाळकर, २०२५ – मारोती मानेमोड, २०२६ – डॉ. विलास खरात व डॉ. देवानंद सोनटक्के.

साहित्य पाठविण्याचा पत्ता

इच्छुक साहित्यिकांनी आपले साहित्य पुढील पत्त्यावर पाठवावे.

सोमनाथ मधुकर टकले
मु. पोस्ट : वडशिवणे, ता. करमाळा,
जि. सोलापूर – ४१३२२३.
मोबाईल : ९६९९७६०८०२

अधिकाधिक साहित्यिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन विश्वकर्मा तरुण मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ मधुकर टकले यांनी केले आहे. यावेळी डॉ. जनार्दन भोसले, दत्तात्रय पिसाळ आणि बाबुराव इंगळे उपस्थित होते.

error: Content is protected !!