शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत केम केंद्राला मिळाली एकूण १८ बक्षिसे
केम (संजय जाधव) – महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून सन २०२३-२४ मध्ये शिक्षकांसाठी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा निकाल नुक्ताच लागला असून या स्पर्धेत केम केंद्राने जिल्हास्तर व तालुका स्तरावरती मिळून १८ बक्षिसे जिंकलेली आहेत
जिल्हास्तरीय मिळालेली बक्षिसे –
- तिसरी ते पाचवी इंग्रजी विषय जिल्हास्तर 3 रा क्रमांक – श्रीम राणी मच्छिंद्र सातव. जि प प्राथमीक शाळा मलवडी
- नववी ते दहावी विज्ञान विषय जिल्हास्तर 3 रा क्रमांक – कु.श्रद्धा किशोर वाईकर, राजाभाऊ तळेकर विद्यालय केम
- सहावी ते आठवी सामाजिक शास्त्र जिल्हास्तर 2 रा क्रमांक – श्री गणेश काशिनाथ जाधव, श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम.
तालुकास्तरीय मिळालेली बक्षिसे –
- पहिली ते दुसरी इंग्रजी विषय 1 ला क्रमांक- श्रीमती सुरेखा तात्याबा चौरे .जि प प्राथ शाळा पाथुर्डी .
- पहिली ते दुसरी भाषा विषय 3 रा क्रमांक -भालचंद्र पांडुरंग गावडे .जि प प्राथ. केंद्रशाळा केम.
- तिसरी ते पाचवी इंग्रजी विषय 2 रा क्रमांक -श्रीमती राणी मच्छिंद्र सातव .जि प प्राथ शाळा मलवडी.
- तिसरी ते पाचवी परिसर अभ्यास 3 रा क्रमांक -श्री प्रताप ज्योतीराम भोसले .जि प प्राथ शाळा निंभोरे .
- सहावी ते आठवी भाषा विषय 2 रा क्रमांक -श्रीमती उर्मिला दादासो खिळे. जि प प्राथ शाळा मलवडी.
- सहावी ते आठवी गणित विषय 1 ला क्रमांक -श्री भालचंद्र पांडुरंग गावडे . जि प प्राथ केंद्रशाळा केम
- सहावी ते आठवी इंग्रजी विषय 1 ला क्रमांक -श्रीमती सुरेखा चौरे .जि प प्राथ शाळा पाथुर्डी .
- सहावी ते आठवी विज्ञान विषय 3 रा क्रमांक -सौ कविता महेश कांबळे. जि प प्राथ शाळा पाथुर्डी .
- सहावी ते आठवी सामाजिक शास्त्र 1 ला 2 रा क्रमांक -श्री गणेश काशिनाथ जाधव. श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम.
- सहावी ते आठवी सामाजिक शास्त्र विषय 3 रा क्रमांक -श्री रेवन्नाथ भाऊराव देवकर.जि प प्राथ शाळा मलवडी .
- नववी ते दहावी इंग्रजी विषय 1ला क्रमांक -श्री विजयकुमार चंद्रभान वनवे .नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केम.
- नववी ते दहावी विज्ञान विषय 1 ला क्रमांक कु. श्रद्धा किशोर वाईकर .राजाभाऊ तळेकर विद्यालय केम
- नववी ते दहावी विज्ञान विषय 2 रा क्रमांक -श्री मनोजकुमार . श्री उत्तरेश्वर हायस्कूल केम.
- नववी ते दहावी सामाजिक शास्त्र विषय 1ला क्रमांक -सौ कविता महेश्वर कांबळे. जि प प्राथमिक शाळा पाथुर्डी .
वरील सर्व बक्षीस पात्र शिक्षकांचे अभिनंदन करमाळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. जयंत नलवडे सो. विस्तार अधिकारी मा. श्री नितीन कदम सो .विस्ताराधिकारी मा. मिनीनाथ टकले सो. केंद्रप्रमुख श्री महेश्वर कांबळे,साईनाथ देवक तसेच केम गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य व कुर्डूवाडी जनता सहकारी बँकेचे चेअरमन श्री दिलीप तळेकर, अजित तळेकर व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी विशेष अभिनंदन केले.केम केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी केले.