सेवानिवृत्त प्राचार्य वसंतराव नलवडे यांचा सत्कार - Saptahik Sandesh

सेवानिवृत्त प्राचार्य वसंतराव नलवडे यांचा सत्कार

करमाळा / संदेश प्रतिनिधी : संदीप कांबळे…

कंदर : कंदर (ता करमाळा) येथील कण्वमुनी विद्यालय व जुनिअर कॉलेज चे सेवानिवृत्त प्राचार्य वसंतराव नलवडे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार आमदार बबनराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी त्यांच्या फंडातून प्रिंटर देण्याचे काम केले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना याचा फायदा नक्की होईल. शिक्षकांच्या समस्या टप्याटप्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे प्रतिपादन आमदार बबनराव शिंदे यांनी केले.

बबनराव शिंदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अकोले येथे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या शाळा विकास निधीतून प्रिंटर वाटप आमदार बबनराव शिंदे व जयंत आसगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. कंदर येथील कण्वमुनी विद्यालय व जुनिअर कॉलेज शाळेला प्रिंटर देण्यात आला .यावेळी शिक्षक आमदार जयंत आसगावकर, कंदरचे सेवानिवृत्त प्राचार्य वसंतराव नलवडे ,आबासाहेब गायकवाड ,बापू निळ, प्राचार्य डॉ. महेंद्र कदम ,प्राचार्य राजेंद्र ठोंबरे ,मुख्याध्यापक अमोल चव्हाण ,सरपंच कांतीलाल नवले,कंदर येथील कण्वमुनी विद्यालय व ज्युनिअर काँलेजचे प्राचार्य बी.एस.पवार, सर्व शिक्षक, करमाळा, माढा व बार्शी येथील मुख्याध्यापक आदी मोठ्या उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!