कुकडी भुसंपदानाच्या भरपाईच्या अहवालासाठी झरे,खडकेवाडीच्या शेतकऱ्यांनी उद्या उपस्थित रहावे - गणेश चिवटे - Saptahik Sandesh

कुकडी भुसंपदानाच्या भरपाईच्या अहवालासाठी झरे,खडकेवाडीच्या शेतकऱ्यांनी उद्या उपस्थित रहावे – गणेश चिवटे

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नाने झरे,खडकेवाडीच्या शेतकऱ्यांना कुकडी डावा कालवा भुसंपदान भरपाई लवकरच मिळणार असलेची माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी दिली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती देताना ते म्हणाले की, कुकडी डावा कालवा २४५ किमी करिता झरे व खडकेवाडीच्या शेतकऱ्यांना भुसंपदान भरपाई लवकरच मिळणार आहे. यासंदर्भात खासदार निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना भरपाई मिळण्यासाठी केलेल्या या प्रयत्नाला आता यश आले आहे. प्रांतधिकारी प्रियांका आंबेकर यांनी यासंदर्भात संबंधित शेतकऱ्यांना तलाठी यांचेमार्फत नोटीसा बजावून अहवाल लवकर सादर करण्याचे आदेश दिले आहेत, या नोटीसा झरे व खडकेवाडी मधील संबंधित शेतकऱ्यांनी झरे (दुरगुडे वस्ती) येथे उद्या बुधवार दिनांक ३ ऑक्टोबर रोजी सकाळी 10:00 वाजता येऊन घेऊन जाण्याचे आवाहन श्री गणेश चिवटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!