ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केलेल्या 103 वर्षीय आजीचे निधन... - Saptahik Sandesh

ग्रामपंचायत निवडणुकीत मतदान केलेल्या 103 वर्षीय आजीचे निधन…

चिखलठाण / संदेश प्रतिनिधी :

चिखलठाण : चिखलठाण (ता.करमाळा) येथील 103 वर्षीय निलावती माणिक गव्हाणे यांचे (ता.६) सायंकाळी सहा वाजता निधन झाले. चिखलठाण येथील सर्वात जास्त वयस्कर व्यक्ती म्हणून त्यांची नोंद होती, मुत्यूसमयी त्या १०३ वर्षाच्या होत्या.

विशेष म्हणजे ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी आपल्या नातवासोबत जाऊन मतदान केले होते. मतदानानंतर नातवाने त्यांच्याबरोबर सेल्फी काढून सोशल मीडियावर पोस्ट केली होती, ती सर्वत्र वायरल करण्यात आली होती.

त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, सून, नातवंडे, पतरूंडे असा परिवार आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांच्या नातवंडाने संपूर्ण ग्रामस्थ व नातेवाईकांना बोलावून शंभरावा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला होता. यामध्ये चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसिरीज मधील बाळासाहेब उर्फ भारत शिंदे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!