लेखी आश्वासनानंतर उन्हाळी आवर्तनासाठीचे रास्ता रोको आंदोलन स्थगित – सरपंच रवींद्र वळेकर

करमाळा(दि.७) : कुकडी डावा कालवा उपविभाग क्र.12 चे उपअभियंता राजगुरु यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेचे सुरू असलेले उन्हाळी आवर्तन सोडण्यासाठी येत असणाऱ्या अडचणी दूर करण्यात यश आले असून दि.६ पासून सायंकाळी ६ वाजले पासून टेल भागामध्ये पाणी दिले जाईल असे लेखी आश्वासन दिल्यामुळे आज (दि.७) करमाळा-कुर्डूवाडी रस्त्यावरती होणारे रास्ता रोको आंदोलन स्थगित केले आहे अशी माहिती निंभोरे गावचे सरपंच रवींद्र वळेकर यांनी दिली आहे.

योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये नसलेल्या गावांना सर्रास पाणी दिले जात आहे. टेल भागातील लव्हे, निंभोरे ,घोटी इत्यादी गावांना राजकीय द्वेषा पोटी पाणी देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप सरपंच रविंद्र वळेकर यांनी केला होता. त्याचबरोबर दि.६ एप्रिल २०२५ पर्यंत टेल भागातील आमच्या गावांना पाणी सोडले नाही तर दि.७ एप्रिल २०२५ रोजी आम्ही करमाळा कुर्डूवाडी रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आला होता. आंदोलन करण्यापूर्वीच त्यांना यश आले आहे. त्यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजने च्या टेल भागातील शेतकरी सरपंच रवींद्र वळेकर यांचे आभार व्यक्त करत आहेत.





