भारत हायस्कूलचे शिक्षक बाळासाहेब शिंदे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

करमाळा (दि.५) : जेऊर येथील भारत हायस्कूलचे शिक्षक बाळासाहेब शिंदे यांनी शैक्षणिक व क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना ज्योतिबा सावित्री जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोलापूर जिल्हा प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने हा पुरस्कार शनिवारी सायंकाळी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळात आयोजित करण्यात आला होता.

हा पुरस्कार सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी श्री सचिन जगताप साहेब, श्री मंगेश चिवटे, प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सचिन नागटिळक यांच्या हस्ते ट्रॉफी प्रमाणपत्र शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार नारायण आबा पाटील उपाध्यक्ष राजूशेठ गादिया जेऊर चे सरपंच व संस्था सदस्य पृथ्वीराज पाटील सचिव प्रा. अर्जुन सरक प्राचार्य आबासाहेब सरोदे उपप्राचार्य नागेश कांबळे महाविद्यालय प्राचार्य डॉ अनंत शिंगाडे भारत प्रायमरी स्कूल चे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे संस्थेचे सर्व संचालक मंडळ संस्थेतीलसर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनी यांनी अभिनंदन केले आहे.




