माजी मुख्याध्यापक तुळशीराम लोंढे-पाटील यांचे निधन - Saptahik Sandesh

माजी मुख्याध्यापक तुळशीराम लोंढे-पाटील यांचे निधन


केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – केम येथील माजी मुख्याध्यापक श्री तुळशीराम अण्णा लोंढे पाटील यांचे आज दि 18 जानेवारी 2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समयी ते 90 वर्षाचे होते.

केम येथील उद्योजक गोकुळ डेअरी चे चेअरमन श्री अरुण लोंढे-पाटील व ब्रिटानिया डेअरी चे व्यवस्थापक डॉ. श्याम लोंढे-पाटील यांचे ते वडील होते. त्यांच्या पश्चात मुले, मुलगी, सुना,नातवंडे, नातसुना व पणतू असा परिवार आहे. ते 90 वर्षाचे समृद्ध, सदृढ व शेवटच्या श्वासापर्यंत स्वावलंबी आयुष्य जगले. त्यांच्या निधनाने केम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे त्यांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी मोठया प्रमाणावर नागरिकांची उपस्थिती होती


Former Principal Tulshiram Londhe-Patil from kem passed away | kem taluka karmala | saptahik sandesh

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!