शिवकीर्ती इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये हळदी कुंकू समारंभ व बाल आनंदी बाजार उत्साहात संपन्न - Saptahik Sandesh

शिवकीर्ती इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये हळदी कुंकू समारंभ व बाल आनंदी बाजार उत्साहात संपन्न

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – केम (ता.करमाळा) येथील शिवकीर्ती इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये हळदी कुंकू समारंभ व बाल आनंदी बाजर भरवण्यात आला होता.

कार्यक्रमाची सुरुवात स्वराज्य जननी राजमाता माँसाहेब जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन सौ. अस्विनी अतुल खूपसे यांच्या हस्ते करून करण्यात आली. यावेळी सौ. सुकेशिनी गोडसे, सौ. आशा कळसाईत, सौ. राधा पलसे, सौ. मनिषा गरड, सौ. आरती सुरवसे, सौ. मोहिनी सुरवसे, सौ. शिल्पा कुंभार, सौ. अर्चना दोंड, सौ. सोनाली दोंड, सौ. पूजा तळेकर, सौ. सुचिता भिलार, सौ. काटवटे सौ. करिष्मा रगडे, सौ. ज्योती भिसे, सौ. कविता काळे, सौ. मनीषा मोटे, सौ. ताई जानकर, सौ. ज्योती देवकर सौ. मोनिका परदेशी आदी महिला पालक उपस्थित होत्या या कार्यक्रमामध्ये महिलांनी उखाणे, कविता, चारोळ्या, व आपल्या जीवनातील आनंदी क्षण व अनुभव सांगितले.

याचबरोबर बाल आनंदी बाजार मधे इयत्ता नर्सरी ते चौथीच्या मुलांनी भाज्या, फळे, मिठाई व शालेय साहित्य अशी एकूण 77 दुकानें लावली होती यातून सुमारे सतरा हजार सातशे रुपयांची उलाढाल झाली. या वेळी सौ. नागरबाई काळे, सहसचिव सौ. रेणुका काळे,उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. श्रद्धा गव्हाणे यांनी तर आभार प्रदर्शन सौ. सारिका जाधव मॅडम यांनी केले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व पालकांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
%d bloggers like this: