गावागावात विचाराचे पडलेले अंतर लक्षात घेऊन गाव जोडो आंदोलनाची गरज – डॉ.ॲड.बाबूराव हिरडे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.27) : पुर्वी गावात एकोपा होता.गावातले वाद गावात मिटत होते. गावातल्या समस्या गावात सोडवल्या जात होत्या, अलीकडे गावागावात विचाराचे अंतर पडले आहे. हे लक्षात घेऊन गाव जोडो आंदोलनाची गरज आहे व त्यासाठी माणसे जोडणारे असे कार्यक्रम आवश्यक आहेत,असे मत ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डाॅ.ॲड.बाबूराव हिरडे यांनी व्यक्त केले.

करंजे (ता.करमाळा) येथे काल (ता.27) गुणीजनांचा सत्कार सोहळा संपन्न झाला त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ह.भ.प..नामदेव वासकर महाराज उपस्थित होते. पुढे बोलताना डाॅ. हिरडे म्हणाले की, अलीकडे राजकारणामुळे माणसातील माणुसकी संपत चालली आहे. प्रत्येक घरातील प्रेम आटत चालले आहे. माणसा माणसातील अंतर वाढत चालले आहे. ते कमी करण्यासाठी अशा उपक्रमाची गरज आहे.
यावेळी प्रा. लक्ष्मण राख, अशोक फुके, बाबासाहेब पाटील , वासकर महाराज, डाॅ. नगरे, डाॅ. रोकडे, अभियंता राजकुमार पवार यांची भाषणे झाली. जिल्हा परिषद प्राथमिक शाऴा करंजे येथील प्रांगणामध्ये करंजे व भालेवाडी येथील कलासंपन्न व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या व आपल्या भुमीचे नाव सातासमुद्रापार घेऊन गेलेल्या गुणीजनांचा सत्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुंदर स्वागतगीताने व ईशस्तवनाने करणेत आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी व गुणीजनांचे स्वागत जिल्हा परिषद प्राथमिक शाऴा करंजे येथील विद्यार्थी लेझिम पथकाने केले.
या सत्कार सोहऴयात डॉ.महेंद्र नगरे,डॉ. रविकिरण पवार,डॉ.श्री.गोरख रोकडे, डॉ.श्री.राहूल कोळेकर, या वैद्यकिय क्षेत्रातील तसेच नामदेव साबळे, रामचंद्र पवार,लक्ष्मण लष्कर,विजय बाबर, शिवाजी साबळे,संपत अडसूळ,धनाजी सरडे, विक्रम कांबळे,अवघडे गुरूजी,वासकर महाराज, विठ्ठल बाबर,सुरेश फुके,हनुमंत जाधव,शहाजी पवार,चंद्रशेखर सरडे,कु.प्राजक्ता पाटील,ऋतुजा सरडे,संभाजी पवार,डॉ.अजिंक्य पवार,अभयसिंह पाटील,डॉ.वसंत तरंगें,सुभाष होगले,श्री.पोपट डोलारे,तसेच रामभाऊ सरडे,उमेश सरडे,सुनिल सरडे,बाळू नवले इ.विविध कला व गुण संपन्नता असलेल्या भूमीपुत्रांना सन्मानित करणेत आले. या कार्यक्रम प्रसंगी माजी मुख्याध्यापक बलभिम पवार,बाबासाहेब पाटील ,ज्ञानदेव पवार इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करणेकामी करंजे भालेवाडी गौरव समिती आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अरविंद जयप्रकाश सरडे, चंद्रशेखर सरडे, आण्णासाहेब सरडे,स्वाती ठोसर,विद्या सुतार व सर्व समितिचे सदस्य यांनी परिक्ष्रम घेतले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राध्यापक लक्षण राख यांनी केले. अभियंता राजकुमार पवार.मारुती तरंगे ,.काकासाहेब सरडे, भाऊसाहेब लावंड मुख्याध्यापक श्री.लक्षमण लष्कर यांनी उत्कृष्ट नियोजन केले.

