करमाळा तालुक्यातील रस्ते व बांधकामासाठी अर्थसंकल्पात 13 कोटी 61 लाख रुपयांची तरतूद – आमदार संजयमामा शिंदे..

करमाळा / प्रतिनिधी :
करमाळा : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, या अर्थसंकल्पामध्ये करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघातील 4 रस्त्यांची सुधारणा करणे व राज्य उत्पादन शुल्क कार्यालय प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करणे या 5 कामांसाठी एकूण 13 कोटी 61 लाख रुपये निधीची तरतूद केली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
यामध्ये 4 रस्ते कामासाठी करमाळा बोरगाव घारगाव ते जिल्हा हद्द रस्ता प्रतिमा 5 सुधारणा करणे – 4 कोटी 50 लाख, राज्य मार्ग 145 ते शेडशिंगे प्रमुख जिल्हा मार्ग 132 सुधारणा करणे – 1 कोटी, लव्हे म्हैसगाव रस्ता प्रजिमा 14 पुलाचे बांधकाम करणे -3 कोटी, रोपळे-केम -वडशिवणे-कंदर ते कन्हेरगाव रस्ता प्रजिमा 12 सुधारणा करणे -1 कोटी, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कुर्डूवाडी या कार्यालयाचे प्रशासकीय इमारत बांधकाम साठी 4 कोटी 11 लाख अशी एकूण 13 कोटी 61 लाख रुपये निधीची तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली असल्याची माहिती आमदार संजय मामा शिंदे यांनी दिली.
2022 अर्थसंकल्पीय स्थगिती दिलेल्या रस्ते कामांची स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्नशील…
2022 च्या अर्थसंकल्पामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळामध्ये मंजूर झालेल्या रस्ते सुधारणा करण्याच्या 10.92 कोटी रुपयांच्या निधीच्या कामावरती शिंदे – फडणवीस सरकारने दिलेली स्थगिती उठवण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती ही आ. संजयमामा शिंदे यांनी दिली .यामध्ये बोरगाव करंजे मिरगव्हाण निमगाव गौंडरे नेरले ते वरकुटे घोटी निंभोरे रस्ता सुधारणा करणे -2 कोटी 85 लाख, मिरगव्हाण अर्जुननगर शेलगाव क सौंदे वरकटने कोंढेज रस्ता प्रजिमा 8 सुधारणा करणे -1 कोटी 90 लाख, कोर्टी दिवेगव्हाण पारेवाडी रेल्वे स्टेशन ते केतुर 2 ते पोमलवाडी रस्ता सुधारणा करणे -2 कोटी 85 लाख, पारेवाडी राजुरी अंजनडोह झरे कुंभेज निंभोरे मलवडी दहिवली कनेरगाव ते वेणेगाव रामा 9 ला जोडणारा प्रजिमा 4 सुधारणा करणे -3 कोटी 32 लाख या कामावरील स्थगिती उठवण्यासाठी ही आपले प्रयत्न सुरू असल्याची माहिती आ.शिंदे यांनी दिली.