मोटारसायकलची समोरासमोर धडक – अपघातातील एकजण ठार..
करमाळा : मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचे उपचारापूर्वीच निधन झाले आहे. हा प्रकार २० सप्टेंबरला सायंकाळी साडेसात वाजता मकाई कारखान्याच्या जवळ घडला आहे. या प्रकरणी अग्नीहोत्री मेहरलाल काळे (रा. कावळवाडी) याने फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की २० सप्टेंबरला सायंकाळी साडेसातच्या सुमारास मी व माझी पत्नी लहान मुलासह रामवाडी येथून हॉटेल मध्ये जेवणासाठी जात असताना मकाई कारखान्या जवळ समोरून येणाऱ्या दुचाकीने जोराची धडक दिली. त्यात मी, माझी पत्नी व मुलगा गंभीर जखमी झालो होतो. त्यानंतर आम्हाला स्थानिक लोकांनी ॲम्बुलन्स बोलावून भिगवण येथील जगदंबा हॉस्पिटलमध्ये ॲडमीट केले.
त्यानंतर उपचारानंतर आम्ही २३ सप्टेंबरला घरी आलो. त्यावेळी ज्याने आमच्या मोटारसायकलला धडक दिली त्याचे नाव शिवकुमार शिवनारायण निषाद (रा. भंडारिया बाझार, उ. प्र.) असे समजले. तसेच अपघातानंतर त्याला उपचारास घेऊन जात असताना रस्त्यातच त्याचे निधन झाल्याचे समजले. या प्रकरणी पोलीसांनी मयताच्या विरूध्द गुन्हा मोटारसायकलची समोरासमोर दाखल केला आहे.