किरकोळ कारणावरून चुलतभावाकडून एकास मारहाण..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : तु मला कंदर येथे नेण्यास का आला नाही. तसेच तुझ्या केळीची झाडे माझ्या शेतात आली आहेत असे म्हणून समाधान भैरू गवळी यास चुलतभाऊ सुजित पांडूरंग गवळी याने दगडाने मारहाण करून जखमी केले आहे. तसेच मोटारसायकलवर दगड मारून मोटारसायकलचे नुकसान केले आहे.

हा प्रकार २ फेब्रुवारीला सायंकाळी साडे पाच वाजता सांगवी नं.२ येथे घडला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की २ फेब्रुवारीला मी कंदर येथे लग्नाला गेलो असता तेथे माझा चुलतभाऊ सुजित गवळी हाही आला होता. तो मला घरी घेऊन जा असे म्हणाला होता. परंतु मी गडबडीत काम असल्याने शेतात लवकर आलो. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजता मी बांधावर पडलेली केळीची झाडे काढत असताना सुजित पांडूरंग गवळी याने तु कंदरला नेण्यास का आला नाही असे म्हणून व तुझी केळीची झाडे माझ्या शेतात आली आहेत. ती काढून घे.. असे म्हणून दगडाने मारहाण करून जखमी केले आहे व मोटारसायकलवर दगड टाकून मोटारसायकलचे नुकसान केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!