छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी यशाचे आधुनिक गड जिंकावेत – प्रा बाळकृष्ण लावंड

करमाळा/ संदेश प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा जीवन प्रवास संघर्षमय होता, आव्हानांवर मात करत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या करारी व जिवलग मावळ्यांचे संघटन आणि नियोजन व अचूक व्यवस्थापन यामुळे अनेक आश्चर्यकारक विजय मिळवले. विद्यार्थ्यांनी शिवतंत्र आत्मसात करून आपले ध्येय साध्य करण्यासाठी अथक परिश्रम घ्यावेत व यशाचे गड काबीज करावेत असे स्फूर्तीदायी विचार व्यक्त प्रा.बाळकृष्ण लावंड यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आयोजित व्याख्यानमालेत त्यांनी व्याख्यान सादर केले.
यावेळी दहिगावचे सरपंच संजय दादा गलांडे,वि .का. सोसा. चेअरमन हरिश्चंद्र शेळके, शा.व्य.समिती अध्यक्ष ज्योतिराम पाडुळे, उपसरपंच नितीन नरुटे , मा. अध्यक्ष बापू कोंडलकर, शा.व्य. समिती उपाध्यक्ष महादेव शेंडगे ,रवी पाडुळे ,पक्षीमित्र कल्याणराव साळुंके, गोपाळ तकीक-पाटील, मुख्या. दस्तगीर शेख उपक्रमशील शिक्षक विजयकुमार राऊत.अंगणवाडी ताई,बहुसंख्य पालक व विद्यार्थी उपस्थित होते. याप्रसंगी प्रा.लावंड यांना राजमुद्रा असलेली शिवप्रतिमा भेट देण्यात आली आणि विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने मिष्टान्न जेवण देण्यात आले. छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने वातावरण दुमदुमून गेले.





