प्रा.ज्योती जावळे यांना पीएचडी प्रदान - Saptahik Sandesh

प्रा.ज्योती जावळे यांना पीएचडी प्रदान

केम (संजय जाधव) : दत्तकला शिक्षण संस्थेच्या इन्स्टिटयूट ऑफ फार्मासुटिकल सायन्स अँड रिसर्च (फॉर गर्ल्स) या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. ज्योती जावळे यांनी औषधनिर्माणशास्त्र शिक्षण क्षेत्रातील एक महत्वाचा पल्ला गाठला. प्रा. ज्योती जावळे यांनी डॉ. वैषाली काशीकर यांच्या मार्गदर्शनाखाली सावीत्रीबाई फुले पुणे विद्यापिठ पुणे येथून पी. एच. डी. प्राप्त केली.

त्यांनी ‘डेव्हलपमेंट अॅण्ड इव्हॅल्युयशन ऑफ नॅनोकॅरीअर फॉर डीलेव्हरी ऑफ अॅन्टीकॅंसर फायटोकेमीकल्स’ या महत्वपुर्ण विषयावरती काम करून प्रबंध सादर केला. यामुळे महाविद्यालयातील इतर सहकारी शिक्षक व विद्यार्थीनींना औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील संशोधन व नवीन विकसीत संशोधन पध्दती यांबद्दल बहूमुल्य मार्गदर्शन लाभेल. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीमुळे महाविद्यालयामध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले आहे.

यामुळे प्रा. ज्योती जावळे यांना संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ, संस्थेचे सचिव सौ. माया झोळ व अमेपुर्वाफोरम चे अध्यक्ष डॉ. अमोल कुलकर्णी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. यावेळी संस्थेचे मुख्य प्रशासकिय अधिकारी तथा प्राचार्य डॉ. विशाल बाबर, दत्तकला कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. हरिबा जेडगे, अनुसया कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य प्रा. अमित पोंदकुले तसेच दत्तकला ग्रुप ऑफ फार्मसीचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!