विविध क्षेत्रातील गुणीजन मंडळी हीच तालुक्याची खरी श्रीमंती - डॉ.ॲड.हिरडे - Saptahik Sandesh

विविध क्षेत्रातील गुणीजन मंडळी हीच तालुक्याची खरी श्रीमंती – डॉ.ॲड.हिरडे

सोलापूर फाऊंडेशनच्या “श्रीमंती सोलापूरची” पुरस्काराचे करमाळ्यात वितरण…

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : तालुक्यातील विविध क्षेत्रातील गुणीजन मंडळी हीच तालुक्याची खरी श्रीमंती असल्याचे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक डॉ.ॲड.बाबुराव हिरडे यांनी सोशल सोलापूर सोशल फाउंडेशनच्यावतीने “श्रीमंती सोलापूरची” पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले.

या कार्यक्रमाला यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेशभाऊ करे-पाटील, डॉ निलेश मोटे, उद्योजक शिवाजी सरडे, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पुढे बोलताना हिरडे म्हणाले की, आजपर्यंत करमाळा तालुक्यातील भूमिपुत्रांनी विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवलेला आहे, करमाळा तालुक्याला काहीसा मागासलेला तालुका समजले जाते, परंतु तालुक्यातील अशी मंडळी म्हणजे तालुक्याची खरी श्रीमंती असून सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून ही श्रीमंती लोकांसमोर येत असल्याचा आनंद या पुरस्कार वितरणच्या निमित्ताने होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना गणेश करे- पाटील म्हणाले की, करमाळा तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्याना सोलापूर सोशल फाउंडेशनच्यावतीने सन्मानित केले जात आहे, त्यांचे कार्य समाजाला दिशादर्शक व अनुकरणीय आसल्याचे प्रतिपादन केले. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवा निमित्त सोलापूर फाऊंडेशनच्या वतीने यशकल्याणी सेवाभवन येथे मान्यवरांच्या प्रयोगशील गट विकास अधिकारी अधिकारी मनोज राऊत,प्रगतशील महिला शेतकरी हर्षाली प्रशांत नाईकनवरे, शेती अवजारे संशोधक बाबुराव कळसाईत, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रसिंह ठाकूर प्रगतिशील शेतकरी पांडुरंग लोंढे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Yash collection karmala clothes shop

यावेळी उद्योजक शिवाजी सरडे व डॉ निलेश मोटे यांची भाषणे झाली. पुरस्कारला उत्तर देताना गट विकास अधिकारी मनोज राऊत म्हणाले की, आपण कोणत्याही क्षेत्रात काम करत आसलो तरी सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे यावेळी त्यांनी पंचायत समिती व काही सामाजिक संस्थांच्या सहकार्याने व्यसनमुक्त झालेल्या पालकांच्या पाल्याला शालेय स्तरावर स्कॉलरशिप देण्याबाबत विचार असल्याचे प्रतिपादन केले. हर्षाली नाईकनवरे यांनी महीला गटाच्या माध्यमातून करत असलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी यशकल्याणी सेवाभावी संस्थेच्या वतीने करमाळा शहरातील दोन शाळांना स्मार्ट टीव्ही भेट देण्यात आला.

S.K. collection bhigwan

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू शिंदे यांनी केले, याप्रसंगी कार्यक्रमाला भाजपाचे दिपक चव्हाण, सोलापूर सोशल फाउंडेशनचे विजय कुचेकर,विपुल लावंड, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे विश्वस्त अविनाश करे पाटील, पुरस्कार निवड समिती सदस्य
प्रा.पाटील सर केमिस्ट असोसिएशनचे.सचिन साखरे, जयेश पवार प्राचार्य नारायण मोटे,शेटफळचे सरपंच विकास गुंड, विलास लबडे, वैभव पोळ, प्रतापसिंह लबडे, सुहास पोळ अशिष पाटील यांच्यासह लोक बहुसंख्येने उपस्थित होते.

Sonaraj metal and crockery karmala
Sonali ply and furniture shop karmala

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!