लंम्पी आजाराने मृत पावलेली जनावरांचे अनुदान शेतकरी राजाला तत्काळ मिळावे – युवा सेनेची मागणी

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) – लंम्पी आजाराने मृत पावलेली जनावरांचे अनुदान शेतकऱ्यांना तत्काळ मिळावे अशा आशयाचे निवेदन युवा सेना जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले, सचिन बागल, गणेश इंगळे यांच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी शमा पवार यांना देण्यात आले.
सोलापूर जिल्ह्यामध्ये लम्पी आजाराने २००० जनावरे मृत पावली आहेत यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे .आधीच कोरोणाच्या महामारीतून शेतकरी राजा सावरत असतानाच त्याला अतिवृष्टीने झोडपून काढले. हाता तोंडाशी आलेला पिकांचा घास पावसाने हिरावून घेतला .त्यातून शेतकरी राजा सावरतो ना सावरतो तोच लगेच जनावरांना लम्पी आजाराने मेटाकुटीस आणले. या आजारात सोलापूर जिल्ह्यातील २९०० जनावरे मृत पावली आहेत. त्यातील फक्त ९१० जनावरांचे अनुदान शेतकऱ्यांना भेटले आहेत आणि त्यातील १९९० जनावरांचे अनुदान शेतकऱ्यांना भेटले नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे .
शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान न भेटल्यामुळे शेतकरी जनावरे खरेदी करू शकत नाही.त्यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान मिळावे. अन्यथा युवा सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा इशारा युवा सेनेच्या वतीने देण्यात आला यावेळी महादेव बिराजदार दिग्विजय मोरे ई युवासैनिक उपस्थित होते.