करमाळा नगरपरिषदेत अजित पवार व लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी - Saptahik Sandesh

करमाळा नगरपरिषदेत अजित पवार व लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी

0

करमाळा | प्रतिनिधी : करमाळा नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या वतीने उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता आकाश वाघमारे यांच्या हस्ते दोन्ही मान्यवरांच्या प्रतिमांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना आकाश वाघमारे यांनी अजितदादा पवार यांच्या कार्याचा आढावा घेत त्यांच्या नेतृत्वगुणांचा, विकासाभिमुख दृष्टिकोनाचा व समाजकार्यातील योगदानाचा उल्लेख केला. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन प्रामाणिकपणा, कष्ट आणि समाजसेवेची भावना जोपासण्याचे आवाहन त्यांनी केले.

तसेच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या राष्ट्रप्रेम, स्वराज्याची प्रेरणा आणि समाजजागृतीच्या कार्याला आदरांजली अर्पण करण्यात आली. लोकमान्य टिळक यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गणेश फलके यांनी केले. यावेळी बापू खारगे, अभय देशपांडे, प्रदीप चौकटे, आजमुद्दीन शेख, ओंकार झाडबुके, सुरज लष्कर, अमित शहा, विक्रम कांबळे तसेच ज्ञानेश्वर वाचन मंदिर अभ्यासिकेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!