बागल गटाचा कोणालाही पाठिंबा नाही – दिग्विजय बागल

करमाळा (दि.८) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत बागल गटाने कोणत्याही पॅनलला किंवा गटाला पाठिंबा दिलेला नाही, असे स्पष्ट करून दिग्विजय बागल यांनी कार्यकर्त्यांना अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

सध्या कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रचार सुरू असून, तीन प्रमुख पॅनल रिंगणात आहेत. परंतु कारखान्याच्या नावाने बागल गटावर टिका केली जात असल्याने व कारखान्याचे नुकसान होऊ नये म्हणून सर्व कार्यकर्त्यांच्या चर्चेनंतर तटस्थ राहण्याचा निर्णय घेतल्याचे बागल यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, कोणत्याही गटाने अद्याप कारखाना सुरू करण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम जाहीर केलेला नाही. प्रचारादरम्यान केवळ आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. बागल गटाने कोणालाही पाठिंबा दिलेला नाही. कुणी पाठिंब्याच्या अफवा पसरवत असेल तर त्या खोट्या आहेत. सर्व कार्यकर्त्यांनी व सभासदांनी तटस्थ राहावे व योग्य वेळी सर्वांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल,” असे आवाहन दिग्विजय बागल यांनी केले आहे.




