९ ऑक्टोबरला करमाळा येथे दिव्यांगांसाठी मोफत साहित्य वाटप शिबीर -

९ ऑक्टोबरला करमाळा येथे दिव्यांगांसाठी मोफत साहित्य वाटप शिबीर

0

करमाळा(संदेश प्रतिनिधी) – उद्या सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी करमाळा येथे दिव्यांगाकरिता जयपुर फुटवेअरचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. हे वाटप मुंबईमधील रत्न निधी ट्रस्ट द्वारा केले जाणार असून करमाळा शहरातील स्वातंत्र्यसैनिक मनोहरपंत चिवटे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल देवीचामाळ रोड येथे सकाळी १० ते दुपारी २ या दरम्यान वाटप केले जाणार आहे.

या शिबिरात कैलीपर्स/कुबड्या, कृत्रिम हात आदी साहित्याचे वाटप केले जाणार आहे तसेच या सोबत चालण्याचे देखील प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

वीरशैव लिंगायत समाज मानूर मठ संस्थानचे महाराज वीरुपाक्ष शिवाचार्य मानुरकर महाराज यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमासाठी रत्ननिधी ट्रस्टचे अध्यक्ष राजीव मेहता, डॉक्टर संचित पॉल (सीईओ धर्मवीर आनंद दिघे हॉस्पिटल, ठाणे) योगेश जानकर (ठाणे मनपा नगरसेवक), मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी वैद्यकीय कक्षचे प्रमुख व करमाळ्याचे सुपुत्र मंगेश चिवटे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आपल्या भागातील दिव्यांग बांधवांना या शिबिराची माहिती पोहोचवावी असे आवाहन आयोजकांनी केले.

अधिक माहितीसाठी संपर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!