केममध्ये आज मोफत आरोग्य तपासणी शिबिर


अनुलोम सामाजिक संस्था व भैरवनाथ मित्र मंडळाचा उपक्रम

केम(संजय जाधव): अनुलोम सामाजिक संस्था व भैरवनाथ मित्र मंडळ, पाटील गल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आरोग्य श्री गणेशाचा’ या उपक्रमांतर्गत आज, मंगळवार दि. २२ सप्टेंबर रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात रक्तदाब (बी.पी.), रक्तातील साखर (शुगर), कॅन्सर तपासणी, नेत्र तपासणी, जनरल चेकअप तसेच ई.सी.जी. आदी विविध आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत. नामवंत शासकीय डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या तपासण्या होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

गरजू नागरिकांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन भैरवनाथ मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!