गोयेगाव येथे रक्तदान शिबिरात ५१ जणांचे रक्तदान

करमाळा : गोयेगाव येथे श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
हे रक्तदान शिबिर कमलादेवी ब्लड बँकेच्या माध्यमातून घेण्यात आले. यावेळी रियाज शेख, अमोल आटोळे, मनोज माळशिकारे, स्वप्नील वायसे, सत्यम पवार, आशोक माळशिकारे, तुषार आटोळे यांच्यासह श्री गणेश तरुण मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
