केम येथील ऊर्मिला तळेकर यांचे निधन

केम (संजय जाधव): करमाळा तालुक्यातील केम येथील ऊर्मिला अरुण तळेकर (वय ६८) यांचे आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी, सून व नातवंडे असा परिवार आहे. त्या सामाजिक कार्यकर्ते अच्युत पाटील यांच्या चुलती, तर संदीप तळेकर यांच्या मातोश्री होत्या. ऊर्मिला तळेकर यांचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्यांच्या निधनाने केम व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
