नेरले येथील अशोक जाधव यांचे निधन - Saptahik Sandesh

नेरले येथील अशोक जाधव यांचे निधन

करमाळा :  नेरले (ता.करमाळा) येथील प्रगतशील बागायतदार अशोक गंगाराम जाधव (वय ६८) यांचे २८ ऑक्टोबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.

अशोक जाधव यांनी प्रतिकूल परिस्थितीत काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. शेती क्षेत्रात प्रगतशील बागायतदार म्हणून त्यांनी नावलौकिक मिळवला होता. तसेच वारकरी संप्रदायाशी त्यांची नाळ जोडलेली असून धार्मिक व आध्यात्मिक विचारांवर त्यांची निष्ठा होती. त्यांनी कष्टातून आपल्या मुलांना योग्य दिशा देत घडवले. वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यांच्या मुलांनीही संघर्षातून उद्योजक क्षेत्रात यशस्वी भरारी घेतली आहे.

युवा उद्योजक महादेव अशोक जाधव आणि बाळासाहेब अशोक जाधव यांचे ते वडील होत.  त्यांच्या पार्थिवावर नेरले येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने नेरले परिसरात हळहळ व्यक्त होत आहे

error: Content is protected !!