देवईबाई फरतडे यांचे निधन

केम(संजय जाधव): करमाळा तालुक्यातील हिसरे येथील देवईबाई शाहूराव फरतडे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
त्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख शाहूराव फरतडे यांच्या पत्नी, तर युवासेनेचे करमाळा तालुकाध्यक्ष शंभूराजे फरतडे यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्या निधनाने फरतडे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून करमाळा तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
