करमाळा ते श्री क्षेत्र संगोबा या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे – विनोद महानवर
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा ते श्री शेत्र संगोबा या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले आहे,या रस्त्याच्या कामामध्ये अधिकारी व ठेकेदारांनी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे, अशी माहिती धनगर समाज उन्नती मंडळाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष विनोद महानवर यांनी व्यक्त केले.
याबाबत श्री.महानवर यांनी म्हटले कि, करमाळा संगोबा रस्त्याचे 2022 सालामध्ये झालेले असून, या रस्त्याच्या कामामध्ये काम न करता बिल काढण्याचा प्रकार झालेला आहे, रस्त्याचे साईट पट्टी व गटार काम न करता बिल आदर करण्यात आलेले आहे, याबाबत करमाळा अभियंता यांना माहिती विचारले असता, त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली, अकलूज येथे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सविस्तर प्रकरणासाठी अपील करण्यात आले, 29/12/2022 या दिवशी अपील करण्यात आले, सुनावणी 21/1/2023 रोजी अकलूज येथे जन माहिती अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या समक्ष झाली सुनावणी मध्ये त्यांनी आदेश काढला की, संबंधित अपील करताना शुल्क भरून सात दिवसाच्या आत माहिती त्वरित द्यावी तरीदेखील सां बा उपविभाग करमाळा माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत व कारणे देत आहेत. असेही त्यांनी म्हटले आहे.
या कामांमध्ये ठेकेदार व अधिकारी यांच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार झालेला दिसून येत आहेत या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी व संबंधित ठेकेदाराची या कामाची वरिष्ठ स्तरावर चौकशी करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल.