ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने केमच्या शेतकऱ्यांचे २ ते ३ कोटींचे नुकसान – नुकसान भरपाई मिळण्याची मागणी
![](https://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2022/10/IMG_20221008_222758-914x1024.jpg)
केम ( प्रतिनिधी – संजय जाधव) : केम (ता. करमाळा) व परिसरात ६/७ ऑक्टोबर रोजी रात्रभर झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसाने अनेक वर्षांचे रेकॉर्ड ब्रेक केले. त्या दिवशी तब्बल १३२ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
या पावसाने १० ते १५ गावांचा संपर्क तुटला. रस्ते पाण्याखाली गेले त्याबरोबर अनेक दुकानात, घरात पाणी शिरूर लाखोंचे नुकसान झाले.याचबरोबर बंधारे ताली,फूटून शेती वाहून गेली आहे. फळबागा, द्राक्षबागा,केळी,कांदा ऊस आदि पिके पाण्याखाली गेली आहेत. यात शेतकऱ्यांचे अंदाजे दोन ते तीन कोटीच्या आसपास नुकसान झाले आहे. या साठी शासनाने कोणताही निकष न लावता सरसकट मदत जाहिर करावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
![](https://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2022/10/IMG_20221008_222810.jpg)
शुक्रवार (दि.७) रोजी तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी मनोज राऊत, कृषी अधिकारी वाकडे, तलाठी प्रमोद चव्हाण यांनी केम गावात पाहणी केली होती.
त्यांना पाण्यामुळे रस्ते बंद असल्याने शेतकऱ्यांच्या बांधावर जाता आले नाही आज करमाळा तालुक्याचे आमदार संजय मामा शिंदे यांनी केम येथील काळे वस्ती,देवकर मळा,गटाळ वस्ती या परिसरात ग्रामस्थांसमवेत पाहणी केली. तहसीलदार,कृषी अधिकारी यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले.
![](http://saptahik-sandesh.com/wp-content/uploads/2022/10/IMG_20221007_162600-859x1024.jpg)
झालेल्या पावसाने रमेश वसंत तळेकर यांची कांदा पेरलेली जमीन वाहून गेली, माणिक पांडुरंग तळेकर यांचा तीन एकर ऊस खाली पडला, अभिमान बाबु सुरवसे यांची नुकतीच लावलेली दिड एकर द्राक्ष बाग, तानाजी आप्पाराव सुरवसे यांची दिड एकर डाळिंब लागवड केलेली बाग, लक्ष्मण सुरवसे यांची तीन एकर मका पाण्यात गेली. ऊत्तरेश्वर तळेकर यांची सिताफळ बाग( चार एकर ) डाळिंब (अडिच एकर), आंबा (दोन एकर ) पाण्यात गेली आहे त्यामुळे अंदाजे तीस लाखाचे नुकसान झाले आहे. सोपान बिचीतकर यांची तीन एकर मका पाण्यात गेली. सावित्रा संजय जाधव दोन एकर ऊस पडला,नामदेव तळेकर यांचा तीन एकर कांदा नुकतीच लागण केली होती. ते पाण्यात गेले. भैरू बिचीतकर तीन एकर ऊस पाण्यात गेला. नानासाहेब तळेकर यांची दोन एकर केळीमध्ये पाणी आहे. बाळू लवळे यांच्या केळित पाणी साचले. मच्छिंद्र कावळे यांची दिड एकर मका ,भारत पळसे यांची तीन एकर मकेत पाणी साचले आहे. अशा प्रकारे केम व परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मिळून अंदाजे दोन ते तीन कोटींच्या आसपास नुकसान झाले आहे.
–संजय जाधव, पत्रकार, केम
केम येथे ढगफुटी मुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने कोणताही निकष न लावता सरसकट मदत जाहिर करावी. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,महसूल मंत्री विखे-पाटिल यांना प्रहार संघटनेचे वतीने पत्र देण्यात आले आहेत.
संदिप तळेकर,तालुकाप्रमुख,प्रहार संघटना, करमाळा.
आंंबा,सिताफळ, डाळिंब यांच्या फळबागा पोटच्या मुलाप्रमाणे रात्रंदिवस आबदून जोमात आणल्या. लाखो रूपयाची औषधे झाली. आंंब्याला व सिताफळाला आता बहार लागला असता अचानक झालेल्या ढगफुटी मुळे माझे प्रचंड नुकसान झाले आहे . माझे कमीत कमी तीस लाखाच्या आसपास नुकसान झाले आहे.
–ऊत्तरेश्वर तळेकर, प्रगतशील शेतकरी, केम