घोटी येथे कष्टकरी नऊ दांपत्याचा सन्मान – जयभवानी क्रिडा व सांस्कृतिक मंडळाचा विशेष उपक्रम
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.9) : घोटी (ता.करमाळा) येथे ज्या कष्टकरी दांपत्यानी कष्टाच्या जोरावर यश संपादन केले अशा नऊ दांपत्याचा विशेष सन्मान जयभवानी क्रिडा व सांस्कृतिक मंडळाने केला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून यशकल्याणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश करे-पाटील, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.एल.बी.पाटील, पोलीस उपनिरिक्षक प्रविण साने, गटविकास अधिकारी मनोज राऊत, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विलासराव पाटील हे होते तर अध्यक्ष म्हणून ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष ॲड डाॅ.बाबूराव हिरडे हे होते.
यावेळी सौ.सुमन व विठ्ठल केवडे, श्रीमती गंगुबाई उध्दव कानाडे, सौ.केशरबाई व ज्ञानदेव खरात , सौ. ठकुबाई व जालिंदर राऊत,श्रीमती मंडोदरी भास्कर झगडे, सौ.मिराबाई व हरीभाऊ दिवटे ,श्रीमती केशरबाई भारत शिंदे ,श्रीमती अन्नपुर्णा बापू वाघमारे,सौ.सुनिता व नंदू अवघाडे यांचे सन्मान स्मृतीचिन्ह, सुवर्णपदक , शाल, व एक पुस्तक देऊन करण्यात आला.
यावेळी ॲड.डाॅ. हिरडे यांचेही भाषण झाले. यावेळी गटविकास अधिकारी मनोज राऊत, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष विलासराव पाटील , सरपंच प्रतिनिधी सचिन राऊत , सरपंच सविता राऊत,दुध संघाचे माजी चेअरमन बाळासाहेब राऊत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक मोहन ननवरे, पोलीस काॅन्स्टेबल सचिन ननवरे, शेतीतज्ञ अजित राऊत, विठ्ठल राऊत, तेजमल बलदोटा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.सुत्रसंचालन प्रा. विष्णू शिंदे यांनी केले.
यावेळी पुरस्कारर्थीना ट्रॉफी,प्रमाणपत्र, गोल्ड मेडल आणि शिवाजी कोण होता हे पुस्तक देण्यात आले.यावेळी कोजागिरी पौर्णिमाउत्सव असल्याने या पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सदर पुरस्काराचे हे प्रथम वर्ष असून या वर्षी कष्टकरी कुटुंब ही थीम घेण्यात आली होती.दरवर्षी नाविन्यपूर्ण थीम घेऊन पुरस्कार देण्याचे मंडळाने ठरविले आहे. याप्रसंगी आभार नागेश खरात यांनी मानले.
घोटी येथील आगळीवेगळी परंपरा…
घोटी येथे गटविकास अधिकारी मनोज राऊत व जयभवानी क्रिडा मंडळ यांनी कष्टकरी परिवाराचा सन्मान करून कष्टाला जे महत्व दिली. ही एक वेगळी परंपरा असून हा आदर्श इतरांनी घ्यावा . ज्यांनी मेहनतीच्या जोरावर समाजात वेगळे स्थान मिळवले ते या सन्मानाने अधोरेखित झाले आहेत.
– गणेश करे-पाटील – अध्यक्ष यशकल्याणी संस्था, करमाळा.