मुस्लिम बांधवांच्या विविध संघटनांमार्फत विश्वरत्न हजरत मोंहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त श्रीराम प्रतिष्ठानमध्ये अन्नदान - Saptahik Sandesh

मुस्लिम बांधवांच्या विविध संघटनांमार्फत विश्वरत्न हजरत मोंहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त श्रीराम प्रतिष्ठानमध्ये अन्नदान

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : विश्वरत्न हजरत मोंहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त श्रीराम प्रतिष्ठान करमाळा येथे अन्नदान वाटपचा कार्यक्रम करण्यात आला आहे. ‌‌ यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, नगरसेवक अतुल फंड, डॉ सादिक बागवान, अशपाक जमादार यांच्या हस्ते अन्नदान कार्यक्रमाचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी पिंटु बेग, जहाँ गीर बेग, जमीर सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी या कार्यक्रमाचे आयोजन रहेनुमा चॅरिटेबल ट्रस्ट, मुस्लिम विकास परिषद, हाजी हाशमोद्दीन तांबोळी चॅरिटेबल ट्रस्ट, भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन करमाळा व करमाळा मुस्लिम समाज यांनी केले. यावेळी अनेक नागरिक व मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!