"रुग्णालय व्यवस्था व्हेंटिलेटरवर" - Saptahik Sandesh

“रुग्णालय व्यवस्था व्हेंटिलेटरवर”

संग्रहित छायाचित्र

वाचकांच्या प्रतिक्रिया

संदेश साप्ताहिक पेपर मधे ‘रुग्णालय कि कुरुग्णालय’ अशा मथळ्याखाली संपादकीय लेख वाचला. या अग्रलेखात उल्लेख केला अशीच अवस्था करमाळा येथील कुटीर रुग्णालयात आहे. काही दिवसांपूर्वी नांदेड येथील शासकीय रुग्णालयात नवजात बालके व ईतर गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांचा योग्य उपचार वेळेवर न मिळाल्याने मृत्यू झाला होता हा गंभीर विषय फक्त नांदेडपूर्ता मर्यादित नाही संपूर्ण महाराष्ट्रातील बहुतेक शासकीय रुग्णालयात अशीच परिस्थिती आहे मग ते जिल्हा आरोग्य केंद्र असो उपजिल्हा रुग्णालय असो प्राथमिक आरोग्य केंद्र असो प्रत्येक ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कर्मचारी यांच्या कामचुकारपणामुळे रुग्णांना योग्य तो उपचार वेळेवर मिळत नाही.

संदेश अग्रलेखरुग्णालय की करुग्णालय

आपल्या करमाळा शहरातीलच शासकीय उपजिल्हा रुग्णालय आहे तेथेही साधा केस पेपर काढायचा म्हटलं तर रुग्णाला किंवा त्यांच्या नातेवाईकांना तासनतास ताटकळत उभं रहावं लागत त्यामुळे वयस्कर मंडळींना नाहक त्रास सहन करावा लागतो आणि त्यातही दुपारी १२ नंतर केस पेपर काढण्यासाठी कुणी गेलं तर तिथे कर्मचारी उपस्थित नसतात नंतर या परत काढा अशी उडवाउडवीची उत्तरं दिली जातात त्याच प्रकारे करमाळा येथे कधी भूलतज्ञ उपस्थित नसतो तर कधी नेत्ररोगतज्ञ नसतो साध ताप सर्दी खोकला यावर उपचार करण्यासाठी रुग्णांना तासनतास ताटकळत उभं राहव लागत बाहेरगावाहून येणाऱ्या वयस्कर महिला पुरुष रुग्णांचे तर भयंकर हाल होतात कोणत्याही प्रकारची माहिती त्यांना दिली जात नाही उद्धटपणे त्यांना कर्मचारी बोलतात, आणि जर एखाद्या रुग्णाला शारीरिक टेस्ट करायची गरज भासली तर उपजिल्हा रुग्णालयात सर्व साहित्य सुविधा असतानाही रुग्णांना अमुकतमुक खाजगी लॅब हॉस्पिटलमध्ये शारीरिक टेस्ट करण्यासाठी पाठवले जाते कारण त्या संबंधित लॅब हॉस्पिटलच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांना वैयक्तिक लाभ मिळतो, पण रुग्णांना ह्या टेस्ट खाजगी हॉस्पिटल मध्ये करणं आवाक्याबाहेर असतं कारण हातावरती पोट असणारे,मोल मजुरी करणारे, इत्यादी छोटं मोठं काम करुन आपला उदरनिर्वाह करणाऱ्या नागरिकांना हे परवडत नाही उपजिल्हा रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या कामचुकार हलगर्जीपणामुळे ते कर्तव्यात कसूर करतात नियमांना धरून काम करण्याऐवजी ते आपल्या मर्जीनुसार उद्धटपणे बोलतात काम करतात त्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी अशा प्राथमिक आरोग्य केंद्र असो उपजिल्हा रुग्णालय असो जिल्हा रुग्णालय असो अशा सर्व शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कर्मचारी यांच्या कामाचा आरोग्य विभागामार्फत आढावा घेऊन किंवा स्वतः पाहणी करून या कामचुकार कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी तसेच रुग्णांना औषध पुरवठा व ईतर सुविधा वेळेवर मिळतील याचे निर्देश संबंधित रुग्णालय व्यवस्थापकांना देऊन रुग्णांची होणारी गैरसोय टाळावी.

समाधान दणाने, करमाळा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!