कानाडगल्लीतील रस्त्याची दुरावस्था…

समस्या करमाळा शहरातील कानाडगल्लीमधील रस्त्याची अवस्था खुप वाईट झाली असुन या कडे जाणीवपूर्वक तर दुर्लक्ष होत नाही ना अशी शंका येऊ लागली आहे. या भागातुन दोन चाकी गाडी चालवताना खुप मोठी कसरत करावी लागत आहे.लहानमुले, वयोवृध्द नागरिक यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे.नवीन पाईपलाईनसाठी सदर रस्ते उखडले गेले होते परंतु कित्येक महीने लोटले तरी हे रस्ते दुरुस्त करण्यासाठी कोणीही वाली नसल्याचे चित्र सध्या आहे.बेवारस जनावरे,मोकाट कुत्र्याच्या त्रासालाही नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.लवकरात लवकर रस्ते दुरुस्तीची मागणी या परिसरातील नागरीकांकडुन होत आहे.

समस्या सोडविण्याची अपेक्षा कुणाकडून करमाळा नगरपरिषद

संबधित छायाचित्रे :

समस्या मांडणारे – नितीन दत्तात्रय चोपडे, कानाडगल्ली, करमाळा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!