२२ वर्षाची विवाहिता बेपत्ता..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : २२ वर्षाची विवाहिता ऊस तोडीच्या कोपीतून बेपत्ता झाली आहे. या प्रकरणी बेपत्ता महिलेच्या पतीने पोलीसात १४ जानेवारीला हरवल्याची नोंद केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की २२ वर्षाची विवाहिता माझ्या सोबत कोपीत रहात असताना स्वत:हून निघून गेली. तीचा तपास लागलेला नाही. या प्रकरणी पोलीसांनी हरवल्याची तक्रार नोंदली आहे.