शनि अमावस्या निमित्त उद्या केम येथे विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

केम (प्रतिनिधी/संजय जाधव): केम (ता. करमाळा) येथील शिवशंभो प्रवेशद्वारा जवळील दक्षिण मुखी हनुमान मंदिरात शनि अमावस्या निमित्त शनिवार (दि.२१) विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक ऊत्तरेश्वर टोणपे यांनी दिली.
शनि अमावस्या निमित्त सकाळी आठ वाजता श्रीस अभिषेक केला जाणार आहे. दुपारी २ ते ४ या वेळेत ह.भ.प. सुखदेव महाराज ननवरे (जलालपूर) यांचे सुश्राव्य हरिकीर्तन होणार आहे. तसेच त्यांना साथ म्हणून गायक भाऊसाहेब पालवे महाराज, सोमनाथ राऊत महाराज, पखवाज वादक संतोष भोसले महाराज, नारायण टोणपे हार्मोनियम उत्तरेश्वर दादा तळेकर, कीर्तन सेवेकरी संजय नवले आहेत आदी असणार आहेत.
कीर्तन झाल्यावर प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहेत, तरी केम व परिसरातील भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.