स्ट्रीट लाईट दिव्याचे खडकेवाडी येथे भाजपाचे गणेश चिवटे यांच्या हस्ते उद्घाटन..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खासदार फंडातून करमाळा तालुक्यातील विविध गावांमध्ये स्ट्रीट लाईट दिवे मंजूर झाले आहेत.
या स्ट्रीट लाईट दिव्याचे उद्घाटन आज मौजे- खडकेवाडी येथे भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.
या उद्घाटन प्रसंगी बोलताना गणेश चिवटे म्हणाले की, सन 2019- 20 मध्ये कोरोना महामारीच्या काळात सर्व खासदार फंड हा आरोग्य विभागात खर्च करण्यात आला होता,त्यामुळे विकास कामांना खोडा निर्माण झाला परंतु येणाऱ्या काळात खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या खासदार फंडातून करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त गावांना विकास कामे मंजूर करून मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी वाशिंबे गावचे उपसरपंच अमोल पवार, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन यांनी मनोगत व्यक्त केले, यावेळी खडकेवाडी ग्रामस्थांच्या वतीने गणेश चिवटे यांची सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल नागरिक सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी भाजपा तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड, झरे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ घाडगे, भैया गोसावी, तसेच खडकेवाडी येथील अशोक जाधव, भारत चौधरी, बंडू शेळके,प्रविण शेळके, धनंजय शिंदे, अजित शिंदे, तुळशिराम शेळके ,संदीप शेळके, दत्ता सुरवसे, पोपट शेळके, रघुनाथ माने, रमेश जगदाळे, शहाजी जाधव, बंडू जाधव, संतोष चौधरी, शहाजी जाधव, आजिनाथ शेळके, इंद्रजीत शिंदे, बळीराम चौधरी, जांबुवंत शेळके, सोमा जाधव, शिवाजी शिंदे, रेवन्नाथ शेळके, संजय चौधरी, दत्तात्रय सुरवसे, धनंजय शिंदे , मनोहर शेळके, प्रज्वल जगदाळे,दयाराम जाधव,आदीजन ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.