महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सतपाल सोनटक्के यांना सुवर्णपदक..

कंदर प्रतिनिधी / संदीप कांबळे..
कंदर : नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कंदर तालुका करमाळा येथील छत्रपती संभाजी राजे कुस्ती संकुला मधील नामवंत मल्ल सतपाल सोनटक्के याने माती विभागात 97 किलो वजन गटात चमकदार कामगिरी करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे व सोबत बुलेट ही जिंकली आहे.
या यशाबद्दल त्याचा नुकताच सत्कार करण्यात आला होता.सतपाल सोनटक्के हा माळशिरस तालुक्यातील मेडद गावचा असून तो अनेक वर्षापासून कुस्ती क्षेत्रात नावलौकिक करीत आहे .नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत माती विभागातून त्याने 97 किलो वजन गटात चमकदार कामगिरी बजावली आहे..याबद्दल आमदार संजय मामा शिंदे यांनी विशेष कौतुक केले असून त्याचा कंदर येथे मोठ्या उत्साहात सत्कार करण्यात आला.
यावेळी छत्रपती संभाजी राजे कुस्ती संकुलाचे संस्थापक पैलवान उमेश इंगळे माजी उपसरपंच तथा वस्ताद रावसाहेब जाधव लखन शिंदे सुहास मुळे राहुल देवडकर बालाजी इंगळे वैभव इंगळे शहाजी कुंडलकर विवेक भोसले आदी उपस्थित होते..
