करमाळ्यात पोथरनाक्यावर लावलेल्या मोटारसायकलची भरदिवसा चोरी
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : करमाळा शहरातील पोथरनाका (Pothare Naka Karmala) विभागात ९ जुलैला सकाळी दहा वाजता लावलेली मोटारसायकल चोरीला गेलेली आहे. या प्रकरणी विजय बापूराव शिंदे (रा.पोथरे) (Vijay Shinde) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझी मोटारसायकल क्र. एमएच ४५ एजे २१०२ हिरो कंपनीची ९ जुलैला सकाळी दहा वाजता पोथरनाका येथे विजय ॲग्रो दुकान समोर लावली होती. मुले शाळेतून परत आल्यानंतर मोटारसायकल घेण्यासाठी गेलो असता, माझी २५ हजार रूपये किंमतीची मोटारसायकल चोरट्यांनी चोरून नेली आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.