ट्रकमधून कापडाच्या बंडलची चोरी
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : चालत्या ट्रक मध्ये चढून ट्रक मधील २५ हजार ३२६ रूपयाचा कापडाचा बंडल चोरला आहे. हा प्रकार ६ जुलैला रात्री बाराच्या दरम्यान पांगरे गावाच्या जवळ घडला आहे. या प्रकरणी नजीरखान अमीरजान ( रा. यशवंतपुरम, ता. मालूर, जि. कोल्हार कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की माझ्याकडे अशोक लेलॅन्ड हा ट्रक असून त्याचा नंबर केए ५१ एइ १५८८ असा आहे. या ट्रकमध्ये अहमदाबादवरून कापडी बंडल घेऊन बेंगलोरला निघालो होतो. पांगरे गावाच्या जवळ लोकविकास डेअरीच्या दरम्यान माझ्या ट्रकमधून २५ हजार ३२६ रूपयाचा कापडाचा बंडल चोरट्यांनी चोरून नेला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.