वरकुटे येथील १८ वर्षाची युवती बेपत्ता - Saptahik Sandesh

वरकुटे येथील १८ वर्षाची युवती बेपत्ता

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : वरकुटे (ता.करमाळा) (Varkute) येथील १८ वर्षाची युवती घरातून स्वत:हून निघून गेली आहे. तिचा शोध करूनही ती न सापडल्याने घरातील पालकांनी ६ जुलैला पोलीसात हरवल्याची तक्रार दिली आहे. या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे, की ही युवती स्वत:हून बाहेर गेली व माघारी येते म्हणून सांगितले, परंतू ती गेली ती पुन्हा आलीच नाही. नातेवाईकांकडे शोध घेऊनही तिचा शोध न लागल्याने हरवल्याची तक्रार दिली आहे. पोलीसांनी या प्रकरणी हरवल्याची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!