उत्तरेश्वर कॉलेज केम येथे 'गुरुपौर्णिमा - एक सोहळा ऋणानुबंधाचा' कार्यक्रम उत्साहात संपन्न - Saptahik Sandesh

उत्तरेश्वर कॉलेज केम येथे ‘गुरुपौर्णिमा – एक सोहळा ऋणानुबंधाचा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

केम (प्रतिनिधी- संजय जाधव) : श्री उत्तरेश्वर जुनियर कॉलेज केम या ठिकाणी काल(दि.१३) गुरुपौर्णिमा निमित्त गुरुपौर्णिमा- एक सोहळा ऋणानुबंधाचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ आदर्श शिक्षक विठ्ठल घाडगे हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. बी. कदम हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात परमपूज्य शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी या कार्यक्रमात बोलताना विठ्ठल घाडगे गुरुजी म्हणाले की मी या शाळेचा माजी विद्यार्थी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. माझी जडणघडण डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारातच झाली. आम्हाला डॉ.बापूजी सारखे गुरु लाभले. विद्यार्थ्यांनी देखील ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांचा वारसा पुढे चालवावा.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री एस. बी. कदम यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगून गुरु शिष्य परंपरा व त्यातील ऋणानुबंध यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुचा मान ठेवीत चांगल्या विचाराची जोपासना करावी असे त्यांनी सांगितले.याच कार्यक्रमात कु. सुकन्या केंगार या विद्यार्थिनीने गुरूंचे महत्त्व या विषयावर सुंदर असे भाषण केले.

उत्तरेश्वर जुनियर कॉलेज केम गुरुपौर्णिमा कार्यक्रम

यावेळी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व गुरूंचे गुलाब पुष्प व श्रीफळ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमास प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे, प्रा. संतोष साळुंखे,. प्रा. अमोल तळेकर हे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!