केम येथील नागनाथ मतिमंद निवासी शाळेस सोलर भेट
केम: (प्रतिनिधी-संजय जाधव) टेंभुर्णी येथील रयत ग्रुप सन१९९९-२००० मधील इयत्ता दहावी बॅच कडून नागनाथ मतिमंद निवासी शाळेस गुरू पौर्णिमा निमित्त सोलर भेट देण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी रामचंद्र नवले होते, तर प्रमुख पाहुणे रयत ग्रुपचे पदाधिकारी होते या शाळेची माहिती शिक्षिका सौ. जाधव यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्यध्यापक नाळे एस.एच.यानी केले तर आभार चव्हाण सर यानी मानले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक वृंद तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.