ऊत्तरेश्वर मंदिरामध्ये गुरू पौर्णिमा साजरी
केम : (प्रतिनिधी-संजय जाधव)
केम येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिरामध्ये रक्तदान शिबिर आयोजित करून गुरू पौर्णिमा मोठया उत्साहात साजरी करण्यात आली.
ही गुरू पौर्णिमा महंत जयंतगिरी महाराज यांच्या सौजन्याने केली जाते. यानिमित्ताने सकाळी आठ वाजता श्री ऊत्तरेश्वर बाबा,गुरूदेव दत्त,हनुमान बजरंगबली व रत्नागिरी महाराज,विदयागिरी महाराज,आनंदगिरी महाराज यांच्या समाधिस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर मंहत जयंतगिरी महाराज यांची पाद्यपूजा श्रीकांत (पप्पु) तळेकर यांच्या हस्ते करण्यात आली. कुंभार महाराज यांनी मंत्र म्हटले. दहा ते साडेबारा या वेळेत ह.भ.प. दादासाहेब बोंगाणे यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले. साडे बारा वाजता मंदिरात पुष्पवृष्टी करण्यात आली.
आलेल्या सर्व भाविकाना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले त्यानंतर कुर्डुवाडी ब्लड बँक व श्री ऊत्तरेश्वर रक्तदाते संघटना यांच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराच उद्घाटन ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे चेअरमन दादासाहेब गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबिरात एकूण ३५ रक्तदात्याने रक्तदान करून गुरूस भेट दिली. या धामींक कार्यक्रमासाठी श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे सर्व सदस्य ऊत्तरेश्वर रक्तदाते संघटना जंयतगिरी महाराज यांचे सर्व भक्त ग्रामस्थ यानी परिश्रम घेतले.