आठवीच्या वर्गातील मुलीस पळवून नेले..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : आठवीच्या वर्गात शिकत असलेल्या १४ वर्षे वयाच्या मुलीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अमिष दाखवून पळवून नेले आहे. हा प्रकार १० मार्चला सकाळी अकराच्या सुमारास घडला आहे. या प्रकरणी मुलीच्या वडीलांनी पोलीसात पळवून नेल्याबाबतची फिर्याद दिली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे, की १० मार्चला मी सकाळी मकाई कारखान्यावर कामासाठी गेलो असता, माझ्या पत्नीचा मला फोन आला.. की अकरा वाजता आपली मुलगी बाहेर जावून येते म्हणून गेली ती परत आली नाही. त्यानंतर आम्ही सर्वत्र शोधाशोध करूनही या मुलीचा शोध लागला नाही. यावर माझ्या १४ वर्षाच्या मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने फुस लावून पळवून नेले आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.