वांगी नंबर १ येथील डॉ. सिताराम जगताप यांचे निधन

करमाळा(दि.११) : वांगी नंबर १ (ता. करमाळा) येथील रहिवासी डॉ. सिताराम नानासाहेब जगताप यांचे वृद्धापकाळाने काल (दि.१०) निधन झाले आहे.
त्यांच्या पश्चात एक मुलगी व तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर काल वांगी १ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक संतोष जगताप, विद्युत निरीक्षक महेंद्र जगताप, व डॉक्टर महेश जगताप यांचे ते वडील होते तर सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता कैलास जमदाडे यांचे ते सासरे होते. डॉ. जगताप यांच्या निधनानंतर वांगी व परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त होत आहे.




