केम येथील पार्वती तळेकर यांचे निधन
केम (प्रतिनिधी-संजय जाधव ) : केम येथील श्रीमती पार्वती दत्तात्रय तळेकर यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले आहे. मृत्यू समयी त्यांचे वय वर्षे ८१ होते. त्या गोसेवक परमेश्वर दत्तात्रय तळेकर यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्या पश्चात पाच मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्या या वयात सुध्दा गायीच्या सेवा करीत होत्या त्यांच्या निधनाने केम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.