NEET परीक्षेत करमाळ्याच्या प्राजक्ता गोयकरचे सुयश

करमाळा ( संदेश प्रतिनिधी) : मिरगव्हाण( ता. करमाळा) येथील प्राजक्ता अश्रूबा गोयकर या विद्यार्थ्यांनीने नीट( NEET) परीक्षेत ९९.२३% (६१८ गुण) मिळवून सुयश संपादन केले आहे.तिच्या या यशानंतर तिचे व गोयकर परिवाराचे मिरगव्हाण व करमाळा तालुक्यातून अभिनंदन करण्यात येत आहे.
प्राजक्ता हिचे प्राथमिक शिक्षण करमाळा येथील कै. सा.ना. जगताप नगर परिषद मुलींची शाळा नं 1 येथे झाले तर माध्यमिक शिक्षण कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्यालय करमाळा येथे झाले. इ 11 वी व 12 वीचे शिक्षण महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथे झाले.
नीट( NEET) परीक्षेसाठी तिने पी. व्ही. संकल्प अकॅडेमी लातूर यांचे मार्गदर्शन घेतले.
पुढे MBBS चे शिक्षण घेऊन चांगला डॉक्टर व्हायची इच्छा प्राजक्ताने यावेळी व्यक्त केली. तिच्या या यशात आईवडील, आजीआजोबा,आतापर्यंतचे सर्व शिक्षक या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन उपयोगी ठरले असे देखील तिने यावेळी सांगितले.