कोणता विचार मतदारांपर्यंत पोहचवायचा हे बागल गटाने स्पष्टपणे सांगून टाकावे - जयवंतराव जगताप - Saptahik Sandesh

कोणता विचार मतदारांपर्यंत पोहचवायचा हे बागल गटाने स्पष्टपणे सांगून टाकावे – जयवंतराव जगताप

माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : करमाळा नगर परिषदेच्या निवडणूक पाश्वर्भूमीवर बागल गटाचा नेमका कोणता विचार करमाळा शहरातील (Karmala Nagar parishad Election) मतदारांच्या घराघरात पोहचवायचा हे बागल गटाने अस्पष्ट सांगण्यापेक्षा स्पष्ट सांगून टाकावे; असा टोला माजी आमदार व जगताप गटाचे नेते जयवंतराव जगताप (Jaywantrao Jagtap) यांनी दिला आहे.

करमाळा नगरपरिषद निवडणूक जाहीर झाल्याने आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी आपल्या बागल गटाचे विचार घराघरात पोहचवा; अशा सूचना दिल्या. त्याबाबत माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी पत्रकार परिषद घेतली त्यात ते पत्रकारांशी बोलत होते.

S.K. collection
S.k. collection clothes shop bhigwan sanket khater advertise saptahik sandesh

पुढे बोलताना मा.आ.श्री. जगताप म्हणाले की, नेमका यापैकी कोणता विचार कार्यकर्त्यांनी घराघरात पोहचवायचा… भुलथापा, स्वप्नाळू व भावनिक भाषणे करून जनतेला भुलविण्याचा, विरोधी गटातील माणसे फोडून त्यांचा तेवढ्याचवेळेच्या निवडणुकीपुरता वापर कसा करायचा, आयत्या संस्था बळकावणे, ज्यांनी बोटाला धरून मोठं केलं त्यांनाच गोठवण्याचा कसा प्रयत्न करायचा, लोकांना आपण केलेल्या भ्रष्ट कारभाराचा विसर कसा पाडायचा, आदिनाथ-मकाई साखर कारखाने (Adinath Karakhana) कसे तोट्यात आणले, जगताप गट, मोहिते-पाटील गट, (Mohite-patil) भाजप-शिवसेना, राष्ट्रवादी आणि आता शिवसेना नंतर पुढे काय असेल हे नक्की नाही.

असे राजकारण करायचे, यातून नेमका कोणता विचार शहरातील मतदारांच्या घराघरात पोहचवायचा दिग्विजय बागल (Digvijay Bagal) यांनी सांगून टाकावे म्हणजे तुमच्या कार्यकर्त्यांना ते बीज लावणे सोपे होईल. कारण नेमकं त्यांनाही माहित नाही तुमच्या मनात कोणता विचार आहे.

Sonaraj metal and crockery
Sonaraj metal and crockery Vishal bhingare shop karmala district solapur

अनेक गावपुढारी, करमाळा शहरातील जगताप गटाचे शिलेदार यांना तेवढ्यापुरते आपलेसे करून आपल्या गटात घेतले व नंतर त्यांची साधी विचारपूस तर सोडाच, पण कोणत्याही राजकीय सत्तेत त्यांना कुठे सामावून घेतल्याचे आठवत नाही, आमच्या कंपनीतला माल पळवून नेऊन त्यांनी त्यांची दुकानदारी थाटली आहे. ही वस्तुस्थिती आहे, हे कोणीही नाकारणार नाही, करमाळा तालुक्याच्या व शहराच्या विकासात तुमचे किती योगदान आहे, हे जनतेला माहित आहे.

तुम्ही किती विकासप्रिय व जनहितवादी आहात ते कारखान्यांच्या कारभारातून सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे जनता तुमच्या कोणत्याही आपलेपणाच्या भाषणबाजीला फसणार नाही, जगताप गटच खरा जनतेचा गट असून जगताप गटाशिवाय कोणालाही नगरपरिषदेत जनता सत्ता देणार नाही; हा जनतेचा ठाम निर्धार व माझा ठाम विश्वास आहे. असेही श्री.जगताप यांनी म्हटले आहे. आजपर्यंत जनतेने दिलेली नगरपरिषदेची सत्ता आम्ही चांगली राबवली. आदिनाथसारखी आम्ही डबघाईला आणून बाजुला थांबलो नाहीत; याचीही आठवण माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी करून दिली.

Sonali ply and furniture
Sonali ply and furniture shop karmala advertise

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!