उमरड येथे भरदिवसा चोरी - Saptahik Sandesh

उमरड येथे भरदिवसा चोरी

करमाळा : उमरड येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून ३ लाख रूपयाची चोरी केली आहे. हा प्रकार ९ जानेवारीला सकाळी८ ते दुपारी ३ च्या दरम्यान घडला आहे. या प्रकरणी धर्मराज रामा चौधरी (रा.वलटे वस्ती, उमरड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, की आम्ही आमच्या घराचे कुलूप लावून गावातील दवाखान्यात व किराणा दुकानात सामान आणण्यासाठी गेलो होतो. त्यानंतर चार वाजता घरी परत आलो. तेव्हा घराचे कुलूप तुटलेले दिसले व घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. चोरट्यांनी कपाटातील रोख रक्कम १ लाख रूपये व २ लाख रूपयाचे सोन्याचे दागिणे असा एकूण ३ लाख रूपयाचा ऐवज चोरीला गेला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!