केम येथील आश्रम शाळेत विभागीय लेझीम स्पर्धा संपन्न

केम(संजय जाधव) : सोलापूर जिल्हा आश्रमशाळा क्रिडा महोत्सव (उत्तर विभाग) लेझीम स्पर्धेचे आयोजन केम (ता. करमाळा) येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत करण्यात आले होते. सोलापूर जिल्हाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सहाय्यक संचालिका मनीषा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा घेण्यात आल्या.

या लेझीम स्पर्धेसाठी बार्शी,माढा,करमाळा तालुक्यातील आश्रम शाळेतील स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेचे उदघाटन माजी जि.प.अध्यक्ष अनिरूद्र कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेमध्ये वैराग येथील आश्रम शाळेने प्रथम क्रमांक तर केम येथील प्राथमिक व माध्य,आश्रम शाळा व्दितीय क्रंमाक टेंभूर्णी येथील आश्रम शाळा तृत्तीय क्रमांक मिळविला.

या सर्व स्पर्धकांची राहण्याची व जेवण्याची सोय केम येथील आश्रम शाळेने केली होती या विजयी स्पर्धकांचे सहाय्क संचालिका मनीषा फुले यांनी कौतूक केले तसेच या संस्थेनी उत्तम सोय केल्याने त्यांचे पण कौतूक केले.
या वेळी जनता सहकारी बॅंकेचे चेअरमन दिलीपदादा तळेकर संस्थेचे अध्यक्ष सुदर्शन तळेकर,सचिव भाऊसाहेब बिचितकर, महाराष्ट बॅंकेचे व्यवस्थापक अडा् साहेब, युवा नेते सागर दौड, केंद्र प्रमुख महेश कांबळे,साईनाथ देवकर, डि,सी,सी,बॅंकेच्या व्यवस्थापिका गाडे मॅडम, तसेच सागर तळेकर अच्युत पाटिल,संदिप तळेकर,आनद शिंदे, गोरख पारखे राहुल आबा कोरे, महेश तळेकर,सर वसंत तळेकर,बापुराव तळेकर, उपस्थित होते या स्पधैसाठी प्रचार्य,मुखयाध्यापक,व सर्व शिक्षक,शिक्षकेत.र कर्मचारी यानी परिश्रम घेतले.



