पावणेअठरा वर्षाच्या मुलीस पळवून नेले - Saptahik Sandesh

पावणेअठरा वर्षाच्या मुलीस पळवून नेले

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : पावणेअठरा वर्षाच्या मुलीस श्रीदेवीचामाळ येथून तरूणाने पळवून नेले आहे. अशी मुलीच्या आईने पोलीसात फिर्याद दिली आहे. यात या महिलेने म्हटले आहे, की १२ नोव्हेंबरला मी व माझा पती मजुरीने कामाला गेलो असता, घरात पावणेअठरा वर्षाची मुलगी एकटीच होती. सायंकाळी आल्यानंतर ती दिसून आली नाही. शोधाशोध करूनही सापडली नाही.

यावरून माझ्या मुलीस मिरगव्हाण (ता. करमाळा) येथील माझ्या नातेवाईकाने पळवून नेले आहे; असा संशय महिलेने व्यक्त केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!